Slider Image
Slider Image
ताजी बातमी

गावाविषयी माहिती

आमचे जिव्हाळे गाव अगदी प्रेमळ व सुखी असे गाव आहे. जिव्हाळे हे गाव ओझर पासून अवघ्या ७ कि.मी. अंतरावर आहे.तसेच निफाड पासून अवघ्या ९ कि.मी. अंतरावर जिव्हाळे हे गाव आहे.गावाचे एकूण भौगोलिक खेत्रफळ ३८९.७४ चौ.कि.मी.असून गावात खूप सुंदर अशी झाडे आहेत. गावाच्या ग्रामपंचायत मध्ये ३ वार्ड आहेत.व एकूण कुटुंब संख्या २७९ आहे .जिव्हाळे गावाची लोकसंख्या १५०३ असून गावात पुरुष लोकसंख्या ७७७ व स्रिया ७२६ इतक्या आहेत.

 गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असून शेती योग्य जमीन आहे.व गावातून एक गंगापूर केनाल ची चारी वाहते.ज्या मुळे पिकांना पाणीपुरवठा होतो.जिव्हाळे गावाचे हवामान तसे उष्णकटिबंधीय आहे. तरी वृक्ष संख्या जास्त असल्यामुळे गावाचे वातावरण थंड व शिओतल आहे. उन्हाळ्यात तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत जाते .तर हिवाळ्यात तापमान १० से. पर्यंत खाली येते.

 जिव्हाळे गावात द्राक्ष व उस तसेच टमाटे व भाजीपाला उतपादन केला जातो.पाणलोट केशात्राचा विकास झाल्यामुळे जलसंधारणाची चांगली सोय आहे.

भौगोलिक स्थान

जिव्हाळे हे गाव निफाड तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे १२ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य क्षेत्रफळ --- हे.आर. असून ग्रामपंचायतीमध्ये ३ वार्ड आहेत. एकूण ४८४ कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या १५०३ आहे. त्यामध्ये ७७७ पुरुष७२६ महिला यांचा समावेश होतो.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे. तसेच गावाला जवळून नदी व नाले असल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणीपुरवठा करण्यास मदत होते. येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३८°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १४°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.

जिव्हाळे गाव प्रामुख्याने द्राक्ष, कांदा, सोयाबीन, मका, गहू, भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध असून परिसरात पाणलोट क्षेत्राचा विकास झाल्यामुळे जलसंधारणाची चांगली सोय आहे.

लोकजीवन

जिव्हाळे गावाचे लोकजीवन शांत व समाधानी आहे. गावात सर्व प्रकारची उत्सव साजरे केले जातात. गावातील लोक एकतेने व शांततेने राहतात. राजकीय दृशिकोन पहिला तर गावात राजकारण आहे परंतु गावतील जनता एकतेने राहते.

लोकसंख्या

लिंग संख्या
पुरुष ७७७
स्त्रिया ७२६
एकूण १५०३

संस्कृती व परंपरा

जिव्हाळे गावात सर्व सन साजरे केले जातात. गावात भागवत सप्ताह होतो. जिव्हाळे गावाचे संसृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे.येथे वर्षभर विविध धार्मिक,सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.या सणांमुळे गावातील मुल, तरुण व वयोवृद्ध सर्वच एकत्र येऊन आनंदोत्सव साजरे करतात. तसेच गावात  कीर्तन भजन व पारंपारिक खेळ याचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरा जपतानाच नविन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्रीयांचा सहभाग  ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो.स्वयंसहाय गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात. यामुळे जिव्हाळे गावाची परंपरा व लोकजीवन यांचा सुंदर संगम साधत असून आजही एकताम्तेने टिकून आहे.  

प्रेक्षणीय स्थळे

 ग्राम देवताचे मंदिर – गावातील प्रमुख देवतेचे मंदिर हे गावाच्या मध्यभागी असून ते श्री खंडेराव मंदिर आहे. तसेच गावाच्या मध्य भागात श्री. दत्त मंदिर आहे दर वर्ष प्रमाणे विविध कार्यक्रम उदा. दही हंडी व गोपाळकाला अशी विविध कार्यक्रम त्या ठिकाणी होतात . कृष्ण जन्मोत्सव  ...ई धार्मिक कार्यक्रम होतात.तसेच श्री खंडेराव महाराज मंदिराचा दर वर्षी प्रमाणे वर्धापन दिन साजरा केला जातो. तसेच मोठ्या प्रमाणात महोत्सव सजत केला जातो. या कार्यक्रमात भंडारा रुपी महाप्रसादा चे आयोजन केले जाते. त्यात देखील गावातील सर्वच  महिला व ग्रामस्थांचा समावेश होतो.

 मारोती मंदिर -  गावातील प्रमुख देवतेचे मंदिर हे गावकर्यांचे श्रद्धा स्थान असून सालाबादा प्रमाणे दर वर्षी सप्ताह सारखे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तसेच मारोती मंदिर हे सणासुदीला ग्रामस्थांना भेटी गाठीचे केंद्र आहे. सणासुदीला मंदिरात रोषणाई केली जाते.मंदिर अगदी चं आहे.

जवळची गावे

जिव्हाळे गाव हे तालुक्यापासून ९ कि.मी. आहे. जिव्हाळे गावाच्या जवळ पिंपळस (रामाचे ) , कसबे सुकेना ,मौजे सुकेना, ओणे,थेरगाव ,दात्याने दिक्षी व ओझर अशी गावे आहेत. वरील गावे ही जिव्हाळ्याशी सामाजिक व शेक्षणिक व्यावसायिक  सांस्कृतिक दृष्ट्या जोडलेले आहे.

ग्रामपंचायत प्रशासन


क्र. पद नाव संपर्क क्रमांक
गावाचे प्रशासक (विस्तार अधिकारी, प.स. निफाड) श्री. संजय राजाराम पवार ९७६३८१२७७७
ग्रामपंचायत अधिकारी श्री. म. जे. एच. जेठवा ९८२२६२९१६३

लोकसंख्या आकडेवारी


२७९
१५०३
७७७
७२६
Logo 1
Logo 2
Logo 3
Logo 4
Logo 5
Logo 6
Logo 7
Logo 8
Logo 9
Logo 10
Logo 11
Logo 12